पुणे : काशेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कष्टकरी असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक म्हणून महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले असून, यापुढेही हे काम अविरतपणे सुरू राहील, अशी ग्वाही प्रभाग क्रमांक २२ मधील काँग्रेस -आघाडीचे उमेदवार अविनाश बागवे यांनी दिली. या प्रभागातील बागवे यांच्यासह महाविकास आघाडीने उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, रफिक शेख व दिलशाद शेख यांनी आजच्या प्रचाराची सुरुवात सर्वधर्मीय समाजासोबत काशेवाडी येथील हजरत चमनशाह दर्ग्यात जाऊन चादर अर्पण करून केली या वेळी काढलेल्या पदयात्रेदरम्यान काशेवाडी येथील हातगाडी, भाजीपाला विक्रेते, तसेच परिसरातील पथारी व्यावसायिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचाशी मुक्तपणे संवाद साधला. या पदयात्रेत मुस्लिम महिला व युवक अतिशय मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी जेष्ठ नागरिक घरातून बाहेर येऊन मनोभावे आशीर्वाद देत होते. या पदयात्रेत माजी राज्यमंत्री रमेश बागवे, विठ्ठल थोरात, बाकेर बागवे, दयानंद अडागळे, हुसेन शेख, राजू मोरे, मोहन माने, दिलीप कांबळे, हुसेन हमजू शेख, रफीक पठाण, दीपक गायकवाड, जाहिदा शेख, सुनील शेंडगे, मारुती कसबे, बापू कसबे व परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.