पुणे – हरकानगर भागातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महिला बचतगट, तसेच मुक्ता फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी आपले प्राधान्य असणार असल्याची ग्वाही इंदिरा अविनाश बागवे यांनी दिले. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग २२ मधील अखिल काँग्रेस महविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार इंदिरा बागवे, अविनाश बागवे, रफीक शेख, दिलशाद शेख यांनी हरकानगर परिसरात पदयात्रा काढली, तसेच या भागातील कष्टकरी महिला आणि गृहिणींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पदयात्रेची सुरुवात वीर गोगादेव यांच्या मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. या पदयात्रेत स्थानिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. इंदिरा यांनी या वेळी प्रत्यक्ष महिलांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशीर राहणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी जुबेरबाबू शेख, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, वीरेंद्र घोसरे, मनीष तांदरे, दयानंद अडागळे, यासर बागवे, मधुकर चांदणे, मारुती कसबे, शफीक शेख, दीपक गायकवाड, फारुक बागवान जावेद शेख व इतर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व मित्रपक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.