प्रभात वृत्तसेवा पुणे – एकलव्य काॅलेज रस्ता, मौर्य विहार रस्ता आणि महात्मा सोसायटी येथील वर्षोनुवर्षे रखडलेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे नागरिकांनी भाजपचे लोकप्रतिनिधींचे कौतुक करीत, तुमच्या या एकजुटीतून प्रभागाच्या विकासाची गती अशीच राहावी, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास सोसायटीतील नागरिकांनी व्यक्त केला. आपल्या विश्वासास आम्ही पात्र राहून लोकसहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करू, असा शब्द किरण दगडे, रूपाली पवार, अल्पना वरपे, दिलीप वेडेपाटील यांनी दिला.प्रभाग १० मधील भाजपचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील, रूपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे, दिलीप वेडेपाटील यांनी भुसारी काॅलनी, महात्मा सोसायटी परिसरातील सारथी शिल्प, मंगलधाम सोसायटी, वृंदावन, रोहन गार्डन, हरिप्लाझा, कुंबरे पार्क, हिल व्हिव, जिजाईनगरी, मौर्य विहार आदी सोसायट्यांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी उमेदवारांच्या कामाचे कौतुक करीत सोसायटीसह प्रभागातील रखडलेली कामांसह नागरी प्रश्नांबाबत चर्चा केली.आशिष गार्डन ते शांतीबन चौकातून एकलव्य काॅलेजमार्गे महामार्गाला जोडणार रस्ता खुला झाला आणि प्रभागातील वाहतूक कोंडीने मोकळा श्वास घेतला. त्याच धर्तीवर वेदभवन, बावधन बुद्रुक आणि खुर्द, महात्मा सोसायटी परिसर, इंदिरा शंकर नगरी, शांतीबन परिसर, सागर काॅलनीसह अन्य वस्ती भागातील रस्ते सुसज्ज आणि सुरक्षित पदपथ देण्यावर भर असेल. लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समन्वयातून प्रभागाच्या विकासाला चांगली गती देण्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.