मांजरी – राम-लक्ष्मणाच्या वेशभूषेतील सोबतचे पात्र आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छबी असलेले लाडका भाऊचे फलक तसेच, ध्वनीवर्धकावरील उत्साहवर्धक संगीत यामुळे प्रभाग क्र.१५ मांजरी बु.-केशवनगर साडेसतरानळी शेवाळेवाडी येथील शिवसेना उमेदवारांचे खास लाडक्या बहिणींकडून ठिकठिकाणी उत्साहात स्वागत होत आहे. हे भारावून जाणारे स्वागत पाहता आमच्या विजयाचा विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना या उमेदवारांनी व्यक्त केली. मांजरी बु.-केशवनगर-साडेसतरानळी-शेवाळवाडी प्रभागातील शिवसेना उमेदवार राजश्री विकी माने, संदीप मारुतराव लोणकर, सीमा सुधीर घुले व निलेश दिलीप घुले यांच्या प्रचारार्थ महादेवनगर, घुले वस्ती परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी माजी जि.प. सदस्य दिलीप घुले व कार्यकर्त्यांनी मतदारांची घरटी भेट घेतली. प्रभागाच्या विकासासाठी आपल्याला एक वेळ पालिकेत जाण्याची संधी देण्याचे आवाहन उमेदवारांनी लाडक्या बहिणींना केले. पदाधिकारी विशाल ढोरे, अमर घुले, सुधीर घुले, विकी माने, सागर घुले, अमोल मोरे, कुणाल मोरे, विजय कामठे, अक्षय तारू, दीपक कुलाळ, पंकज पवार, निळकंठ आण्णा, तेजस गायकवाड, आनंद मोरे, शैलेंद्र शेलार, चेतन जाधव, आरिफ पटेल, शंतनू सरकार, श्रीधर अडकुटे, तुषार मरळ, निकिता गायकवाड, गौरीशंकर घुले, देविदास जगताप, समीर मोरे आदींसह कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.