पुणे : नागरिकांना देण्यात आलेल्या पायाभूत सुविधा, नागरी प्रश्नांची तात्काळ सोडवणूक आणि जनतेशी थेट संवाद या त्रिसूत्रीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभागात भक्कम जनाधार निर्माण झाला असल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे. प्रचारादरम्यान सुगत (श्रीशैल) चंद्रशा दसाडे, शोभा संतोष नांगरे, श्वेता संग्राम होनर-कामठे आणि बाळासाहेब अटल यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाची भूमिका मांडली. प्रभाग क्रमांक २१ अंतर्गत येणारा मुकुंदनगर व सैलसबरी पार्क परिसरात रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सामाजिक विकासाच्या कामांमध्ये ठोस कृती केली जाणार आहे. काम करणाऱ्यांनाच संधी देण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूनेच कौल असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले.