पुणे : सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी एसआरए योजने अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आलेल्या सदा -आनंद नगरच्या धर्तीवर मंगळवार पेठ परिसर झोपडपट्टीमुक्त करण्याचा आपला मानस असून या परिसरातील नागरिकांना हक्काचे घर देण्याचे आश्वासन प्रभाग क्रमांक २४ (ब)च्या राष्ट्रवादी काॅग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी यांनी दिले. शेट्टी यांच्या निवडणूकीचा प्रचार छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम पासून सुरू करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद कृष्णा शेट्टी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. २२८ मंगळवार पेठ, २२० मंगळवार पेठ, शाहीर अमर शेख रामायण मित्र मंडळ, वजन काटा, मरियम नगर, सिद्धार्थ नगर, कॉलनी नंबर २ , श्रमिक नगर, इंदिरानगर भागातील नागरिकांशी संवाद साधला. माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांचा हा जुना वॉर्ड असून तिथं त्यांनी गेले ४० वर्ष कार्यरत आहेत. हा परिसर त्यांचा बालेकिल्ला समजला जातो.त्यांच्या पुढाकारातून या परिसराचा कायपालट करण्याचा मानस यावेळी सुजाता शेट्टी यांनी व्यक्त केला. अजित पवारांची सभा सुजाता शेट्टी यांच्या प्रचारार्थ उद्या (बुधवारी) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सभा होणार आहे. संध्याकाळी सात वाजता नरपतगिरी चौकात ही सभा होणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून हा परिसर शेट्टी यांचा बालेकिल्ला असून या सभेने शेट्टी यांच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर होणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे. यावेळी शेट्टी यांच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.