पुणे : महापालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून सनी विनायक निम्हण यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परदेशात शिक्षण घेऊनही देशात परत येत उद्योग, व्यवसाय आणि समाजकारण यांचा समतोल साधणारे एक आश्वासक व्यक्तिमत्व आहे. औंध- बोपोडी प्रभागातील मतदारांमध्ये त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक भावना असून, त्यांना जनसमर्थन लाभत असल्याचे दिसून येत आहे. यंदा ते भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत. सनी यांचे शालेय शिक्षण एसएसपीएमएस आणि मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल झाले आहे. एमआयटीमधून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर ‘कन्स्ट्रक्शन अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट’मध्ये एमएस करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातील जागतिक कीर्तीच्या मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण पूर्ण केले. वडील दिवंगत आमदार विनायक निम्हण हे राज्यातील मान्यवर व्यक्तिमत्त्व असले, तरी मुलामध्ये शिक्षणाची किंमत, कष्टाचे महत्त्व आणि आत्मनिर्भरतेची जाणीव कायम राहावी, या उद्देशाने त्यांनी परदेशी शिक्षणासाठी सनी यांना एज्युकेशन लोन घेण्याचा सल्ला दिला. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर सनी निम्हण यांनी ते कर्ज पूर्णपणे फेडून जबाबदारीची प्रगल्भता दाखवून दिली. आज पुण्यातील एक प्रभावी तरुण राजकीय व सामाजिक नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. त्यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक-राजकीय वारसा पुढे नेत असून, प्रभाग क्रमांक ८ – औंध बोपोडीमध्ये त्यांना उच्चशिक्षित म्हणून सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे.