पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक २४ (ब) कसबा गणपती- कमला नेहरू हाॅस्पिटल- केईएमच्या उमेदवार सुजाता शेट्टी यांच्याकडून प्रभागात नागरिकांच्या वैयक्तिक भेटींवर भर दिला जात आहे. शेट्टी यांनी गुरुवारी प्रभागातील सदा आनंदनगर, कानिफनाथ मंदिर, मद्रासी गणपती, रास्तापेठ परिसरात घरोघरी जाऊन संपर्क साधला. या वेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेत संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले. या वेळी महिलांकडून शेट्टी यांनी आतापर्यंत प्रभागात केलेल्या विकासकामांचे कौतुक करत पुन्हा महापालिकेसाठी निवडून देण्याचे आश्वासनही शेट्टी यांना दिले.शेट्टी यांनी या परिसरात महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची घरे मिळवून दिली आहेत. याशिवाय या परिसरातील झोपडपट्ट्यांमधील नागरिकांसाठी पाणी, ड्रेनेज स्वच्छता याकडे विशेष लक्ष दिले असून, नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी उपाय योजना राबविलेल्या आहेत. मतदारांच्या भेटीसाठी गेल्यानंतर त्यांच्याकडून या विकासकामांचे कौतुक केले जात आहे. नागरिकांकडून प्रभागातील समस्यांही त्यांच्यापुढे मांडल्या जात आहेत. या समस्यांची नोंदणी घेऊन त्या निवडणुकीनंतर महापालिकेकडे मांडून त्या सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही शेट्टी यांच्याकडून दिली जात आहे. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या या वेळी मोठया संख्येने प्रचारात सहभागी होत आहेत.