पुणे : प्रभाग क्रमांक २३ ( नानापेठ-रास्तापेठ) मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार ॠतुजा तेजस गडाळे यांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ॠतुजा यांनी प्रभाग पिंजून काढला असून शेवटच्या टप्प्यात ॠतुजा यांच्याकडून घरोघरी भेटींवर भर दिला जात आहे. या भेटीत प्रभागात सुशिक्षित उमेदवार दिल्याने प्रभागाच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास मतदारांकडूनच व्यक्त करण्य़ात येत आहे. विशेषत: महिला मतदार तर युवा वर्गांकडून ॠतुजा यांच्या उमेदवारीचे विशेष कौतूक केले जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नानापेठ-रास्ता पेठ परिसरात मोठया प्रमाणात दाट लोकवस्ती आहे. तसेच व्यावसायिक अस्थापना आहेत. त्यामुळे या भागात मोठया प्रमाणात वर्दळ असून वेगवेगळया घटकांच्या वेगवेगळया समस्या असून त्या सोडविण्यासाठी ॠतुजा यांच्याकडून प्रभागासाठीच्या आपल्या विकासाच्या योजना तसेच या समस्या सोडविण्य़ासाठी महापालिकेच्या माध्यमातून करण्याच्या कामाचा आराखडा मांडला जात आहे. त्याचे मतदारांमधून विशेष कौतूक होत आहे. तसेच या तरुण युवतीला दिलेल्या उमेदवारीचे स्वागत करत त्या सक्षमपणे आपली जबाबदारी पार पडतील, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रभागात ॠतुजा यांना सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याने मतदार आपल्यालाच संधी देतील असा विश्वासही त्या या भेटीवेळी व्यक्त करत आहेत.