PMC Election | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक २० (शंकर महाराज मठ – बिबवेवाडी) मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गौरव गणेश घुले, प्रितम रमेश नागापुरे, अस्मिता विशाल शिंदे आणि रश्मी विक्रांत अमराळे या पॅनेलने प्रभागात प्रचाराचा धडाका लावला असून सोसायट्यांमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य प्रचार दौऱ्यात या उमेदवारांनी गगनविहार सोसायटी, गंगाधाम फेस १ व २, वर्धमानपुरा, शंकर महाराज सोसायटी, ईशा एमराल्ड, ईशा संगम, हार्मोनी सोसायटी, गुरु गणेश सोसायटी आणि स्वयंभू हिल्स या भागात पदयात्रा काढली. तसेच चाफळकर कॉलनी, सुपार्श्वनाथ, अरिहंत, सूर्यप्रकाश, ऋतुराज, प्रेमनगर, मोतीबाग, नवकार सोसायटी आणि केसरी सदन या सोसायट्यांमधील नागरिकांशी थेट संवाद साधला. उमेदवारांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली, तसेच आपल्या समस्या जाणून घेतल्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. प्रमुख कार्यकर्त्यांची फळी मैदानात या प्रचारात उमेदवारांना बळ देण्यासाठी परिसरातील मान्यवरांची मोठी फळी उपस्थित होती. यात चंद्रभान ठाकूर, शशिशेठ कोठारी, सुभाष लोढा, दत्ता राजगिरे, सचिन पायगुडे, पंकज रासकर, नरेश पवार, तुषार भोसले, सचिन काची, शुभम गोयल, सचिन पासलकर, लक्ष्मण नरवडे, सदाभाऊ चव्हाण आणि विशाल ठाकूर यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच बालाजी पाटील, साकोरे सर, भगवान साळुंके, अनुज केंजळे, शिवम नायडू, विपुल पाटील, कुणाल खांगटे आणि रोहन दुगड हेदेखील जनसंपर्क यात्रेत सहभागी होते. या प्रचार फेरीमुळे प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती अधिक भक्कम झाली असून, मतदारांचा कल ‘विकास’ करणाऱ्या उमेदवारांकडे असल्याचे दिसून येत आहे.