PMC Election: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांचा सूर्यप्रभा गार्डन, लाईट हाऊस, गंगाधाम सोसायटी, गगन गॅलक्सी, सॉलिटेअर आणि वसंत सोसायटी या परिसरांमध्ये प्रचार दौरा उत्साहात पार पडला. या दौऱ्याच्या निमित्ताने गौरव घुले, प्रितम नागपुरे, रश्मीताई अमराळे आणि अस्मिताताई शिंदे यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. महिला आणि युवकांचा मोठा सहभाग हे या दौऱ्याचे मुख्य आकर्षण होते. गुरुकृपा महिला मंडळ तसेच कुणाल खांगटे व मित्र परिवाराने यावेळी मोठी उपस्थिती दर्शवली. नागरिकांनी ठिकठिकाणी उमेदवारांचे स्वागत केले आणि आपला पाठिंबा व्यक्त केला. प्रचारादरम्यान परिसरात सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. “जनतेचा हा उत्साह विजयाची खात्री देणारा आहे. भविष्यातही असाच थेट संवाद कायम ठेवून आम्ही प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध आहोत,” असा निर्धार यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.