पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मध्ये लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. लोक जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय उत्तम आहेर यांचेकडून प्रभागातील उमेदवार विजय ढेरे याना अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, लोक जनशक्ती पार्टी ही एनडीए सरकारची घटक पक्ष असून, केंद्रात एनडीएच्या धोरणांनुसार कार्यरत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खा. चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. शर्मीभाई हाव यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (AP) सोबत एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (AP) च्या सर्व उमेदवारांना लोक जनशक्ती पार्टीकडून पाठिंबा देण्यात येणार असून, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय सहभाग घेणार आहेत. तसेच प्रचार साहित्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (AP) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. चिराग पासवान यांचा फोटो सन्मानाने वापरण्यात यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. शिव, फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या शक्तींना एकत्र आणून भाजपविरोधी लढा अधिक मजबूत करण्याचा निर्धार या पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महापालिका निवडणुकांच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, आगामी काळात या राजकीय समीकरणांचे परिणाम निवडणूक निकालांवर दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.