PMC Election: पुणे महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी फक्त आठवड्याभराचा कालावधी शिल्लक राहिला असून शंकर महाराज मठ बिबवेवाडी, प्रभाग क्रमांक २० मधील सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. राजेंद्र यशवंत शिळीमकर, तन्वी प्रशांत दिवेकर, मानसी मनोज देशपांडे, महेंद्र माणिकचंद (मुथ्था) सुंदेचा यांच्या वतीने राजयोग सोसायटी, पुनम पार्क, एकदंत सोसायटी सह ठिक ठिकाणी कोपरा बैठक घेण्यात आल्या, तर शिवशंकर सोसायटी परिसरात रॅली काढून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कात्रज मधील जाहीर सभेनंतर दक्षिण उपनगरात भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक २० मधील चार ही उमेदवार थेट घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यावर भर देत आहेत. दरम्यान, बुधवारी दिवसभरात विविध भागात नागरिकांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या नंतर नागरिकांचा विश्वास, सहकार्य आणि आपुलकीची भावना हीच आमच्या लोकसेवेच्या वाटचालीतील खरी ताकद असून, याच बळावर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू, तसेच प्रभागाचा विकास हा नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन असेल, असे आश्वासन उमेदवारांनी दिले आहे. यावेळी कैलास थोपटे, प्रताप इंदलकर, रावसाहेब पासलकर, तन्वी करूरकर, अंजली खानविलकर, मिना रणवरे, रेवती बदाम, संजना वाडकर, प्राजक्ता उदमले, प्राजक्ता चौगुले, सारिका भोसले यांच्यासह भारतीय जनता पक्ष व आरपीआय महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.