बाणेर – पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘प्रभाग क्रमांक ९’ मधील अपक्ष उमेदवार पूनम विशाल विधाते (चिन्ह – कप बशी) यांच्या प्रचारास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. प्रचार दौऱ्याची सुरुवात बाणेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचार दौऱ्याला पुढे सुरुवात झाली. या प्रचार दौऱ्यात पूनम विशाल विधाते यांच्यासोबत अपक्ष उमेदवार प्रमोद आण्णा निम्हण (चिन्ह – शिट्टी) हे देखील सहभागी होते. दोन्ही उमेदवारांनी नागरिकांच्या घरोघरी भेटी देत प्रत्यक्ष संवाद साधला. परिसरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, वीज, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. बाणेर गावठाण परिसरातील नागरिकांनी या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिले. नागरिकांनी दाखवलेली आपुलकी आणि सकारात्मक प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत ‘कप बशी’ आणि ‘शिट्टी’ या चिन्हासमोरील बटण दाबून पूनम विशाल विधाते आणि प्रमोद आण्णा निम्हण यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले. प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा संकल्प यावेळी नागरिकांसमोर मांडण्यात आला. नागरिकांनी व्यक्त केलेला पाठिंबा आणि दिलेला विश्वास हीच आमच्या पुढील वाटचालीची खरी प्रेरणा असल्याचे पूनम विधाते यांनी यावेळी सांगितले.