मांजरी – केंद्रात व राज्यात भाजप महायुतीचे सरकार असून महापालिकेतही भाजपाचाच महापौर होणार आहे. त्यामुळे प्रभाग क्र. १५ मधील भाजपच्या चारही उमेदवारांना प्रतिनिधित्वाची संधी देऊन या भागाचा सर्वांगीण विकास साधावा. यासाठी साडेसतरानळी गावातून भाजपच्या सर्व उमेदवारांना मतांची सर्वाधिक आघाडी देण्याचा निर्धार हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भूषण तुपे तसेच हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप तुपे यांनी व्यक्त केला. मांजरी बु.-केशवनगर-साडेसतरानळी-शेवाळेवाडी प्रभाग क्र.१५ मधील भारतीय जनता पार्टी व आरपीआय (गट) चे अधिकृत उमेदवार नंदा अनिल आबनावे, डॉ. दादा कोद्रे, सारिका अमित घुले व शिवराज बबनराव घुले यांच्या प्रचारार्थ साडेसतरानळी परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी माजी सभापती भूषण तुपे, माजी उपसभापती संदीप तुपे, डॉ. बाळासाहेब बहिरट, राहुल शिंदे, हर्षवर्धन तुपे, महेंद्र तुपे, अनंता दुबे, प्रशांत घुले, कांचन तुपे, बाळासाहेब घुले, सुमित घुले, वंदना कोद्रे, अमित घुले यांच्यासह प्रभागातील भाजप व आरपीआय (गट) चे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.