हडपसर – हडपसर–सातववाडी प्रभाग क्र. १६ येथील प्रत्येक नागरिकाचा विश्वास, सुरक्षितता आणि प्रगती हेच आमच्या कार्याचे केंद्रबिंदू असून विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांसोबत उभे राहणे हीच आमची खरी भूमिका आहे. त्यामुळे प्रभागातील जनता भाजपाच्या चारही उमेदवारांना विजयी करेल, असा विश्वास माजी नगरसेविका व उमेदवार उज्वला जंगले तसेच उमेदवार शिल्पा होले यांनी व्यक्त केला. भाजपच्या प्रभाग क्र. १६ मधील उमेदवार शिल्पा नितीन होले, उज्वला सुभाष जंगले, संदीप रामचंद्र दळवी व मारुती आबा तुपे यांच्या प्रचारार्थ हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर परिसरात परिचय पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व उमेदवारांनी मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. या वेळी गणेश फुलारे, बाळासाहेब हिंगणे, नितीन आरू, आकाश डांगमाळी, सोनल कोद्रे, सविता हिंगणे, संदीप कोद्रे, नंदा हिंगणे, विशाल तुपे, दिलीप दांगट, संदीप शेवाळे, गणेश आबनावे, अंबादास तांबे, सुनील जांभळे, अरुण साळुंखे, शिवलिंग हिरेमठ, शैलेश भिंगारे. रोहन नरके, उमेश जाधव, अजित कांबळे, बापू माने, विकास काळे, बाळासाहेब दौंडकर, सतीश भिसे, संभाजी जाधव, विनायक झगडे, कैलास जगताप, माणिक चौरे, विजय उबाळे, संतोष दळवी, तात्यासाहेब दिवेकर, केशव भापकर, विलास माने, जिजाबा पवार, जयश्री भंडारे, अनिता जाधव, मीनाक्षी मांडे, कविता पाटील गायकवाड आदी उपस्थित होते.