प्रभात वृत्तसेवा वाघोली – पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपच्या उमेदवारांनी सोमनाथनगर, शिवशंभो पार्क, सोपाननगर, काळभोर वस्ती, चंद्रभागा पार्क, पवार वस्ती, माळवाडी आदी परिसरात उत्साहात प्रचार दौरा झाला. विविध भागांत नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या समस्या, अपेक्षा व सूचना ऐकत विकासाभिमुख संवाद साधला. संवादातून केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कामाचा विश्वास देणारा हा दौरा ठरला. प्रचार दौऱ्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्रेयस प्रीतम खांदवे, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, अनिल दिलीप सातव, रामदास दत्तात्रय दाभाडे उपस्थित होते. सर्व उमेदवारांनी नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत परिसराच्या विकासासाठी पक्षाची ठोस भूमिका मांडली. पदयात्रेतून घराघरांपर्यंत पोहोचत लोकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची आमची सातत्यपूर्ण भूमिका राहील. लोकसहभागातूनच विकास शक्य आहे. या विश्वासावर आजवरची समाजसेवेची वाटचाल आम्ही करीत आलो आहोत. यापुढेही करीत राहणार, अशी ग्वाही दाभाडे यांनी दिली.नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्षम, तत्पर आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या चारही उमेदवारांना मताच्या माध्यमातून भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांकडून मिळणारा हा विश्वास आणि साथ पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देणारी आहे असे अनिल सातव यांनी सांगितले. हिंदवी पार्कमध्ये प्रचार दौरा खूपच उत्साहवर्धक गाठी भेटी आणि सभा यशस्वी झाली. नागरिकांचा प्रेमळ प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचे पठारे यांनी सांगितले. ग्रीन पार्क येथे प्रचारार्थ कोपरा सभा आणि गाठी भेटी पार पडल्या. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेरणादायी होता. सर्वांच्या सहकार्यासाठी आभार दाभाडे यांनी मानले. “पदयात्रा प्रचार दौऱ्यातून आम्ही थेट जनतेच्या दारात पोहोचलो. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांचा सखोल संवाद साधत विकासाचा स्पष्ट संदेश दिला. महिला, युवक, ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा आमच्यासाठी प्रेरणादायी ठरला. ही पदयात्रा म्हणजे केवळ प्रचार नव्हे, तर लोकांच्या मनाशी नातं जोडण्याची चळवळ आहे. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही परिवर्तनाची ही वाटचाल जोमाने पुढे नेत आहोत.” – रामभाऊ दाभाडे, उमेदवार. भाजप.