प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी (दि. 15) मतदान होणार आहे. पुणे महापालिकेमध्ये 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मतदान प्रकियेसाठी पालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात एकूण 4 हजार 11 इतकी मतदान केंद्र आहेत. सर्वाधिक मतदान केंद्रे ही बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव या 38 क्रमांकाच्या प्रभागात एकूण 188 मतदान केंद्रे आहेत. त्यानंतर सूस-बाणेर-पाषाण या 9 क्रमांकाच्या प्रभागात 173 मतदान केंद्रे आणि विमाननगर-लोहगाव या 3 क्रमांकाच्या प्रभागात 135 मतदान केंद्रे असणार आहेत. शहरात सर्वात कमी 70 मतदान केंद्रे अप्पर सुप्पर इंदिरानगर या 39 क्रमांकाच्या प्रभागात आहेत.यंदाच्या पालिका निवडणुकीत सरासरी 900 ते 1200 मतदारांसाठी एक मतदान केंद्र याप्रमाणे मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यंदाच्या निवडणुकीत चारचा प्रभाग आहे. त्यामुळे मतदारांना चार उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात कसबा विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयातील शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई प्रभागात 80 मतदान केंद्रे, नवी पेठ-पर्वती प्रभागात 80 मतदान केंद्रे आहेत. प्रभागाचे नाव आणि कंसात मतदान केंद्रांची संख्या कळस-धानोरी (110), फुलेनगर-नागपूर चाळ (89), विमाननगर-लोहगाव (135), खराडी-वाघोली (133), कल्याणीनगर-वडगावशेरी (92), येरवडा-गांधीनगर (80), गोखलेनगर-वाकडेवाडी (90), औंध-बोपोडी (110), सुस-बाणेर-पाषाण (173), बावधन-भुसारी कॉलनी (92), रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर (79), शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी (80), पुणे स्टेशन-जयजवाननगर (90), कोरेगाव पार्क-मुंढवा (84), मांजरी बुद्रुक (124), हडपसर-सातववाडी (98), रामटेकडी-माळवाडी (94), वानवडी-साळुंखेविहार (80), कोंढवा खुर्द-कौसरबाग (115), बिबवेवाडी-महेश सोसायटी (76), मुकुंदनगर-सॅलसबरी पार्क(75), काशेवाडी-डायस प्लॉट (78), रविवार पेठ-नाना पेठ (88), कमला नेहरू हॉस्पिटल-रास्ता पेठ (75), शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई (80), गुरुवार पेठ-घोरपडे पेठ (82), नवी पेठ-पर्वती (80), जनता वसाहत-हिंगणे खुर्द (82),डेक्कन जिमखाना-हॅप्पी कॉलनी (76), कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी (79), मयूर कॉलनी-कोथरूड (90), वारजे-पॉप्युलरनगर (98), शिवणे-खडकवासला (130), नर्हे-वडगाव बुद्रुक (114), सनसिटी-माणिक बाग (78), सहकारनगर-पद्मावती (90), धनकवडी-कात्रज डेअरी (84), आंबेगाव-कात्रज (188), अप्पर-सुप्पर-इंदिरानगर (70), कोंढवा बुद्रुक येवलेवाडी (112),महंमदवाडी-उंड्री (134).