PMC Election 2026 | पुणे शहरातील प्रभाग क्रमांक २६ या ठिकाणच्या मतदान केंद्रांवर तांत्रिक अडचणींमुळे मशीन बंद झाली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाग क्रमांक २६ शुक्रवीर पेठेतील विजयवल्लभ शाळेतील मशीन बंद पडली. पुण्यातील महात्मा गांधी उर्दू शाळा गुरुवार पेठ या ठिकाणीही दोन ठिकाणी मशीन बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मशीनवर असलेला सिक्वेन्स देखील चुकला असल्याचा उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. मशीनवरील सिक्वेन्स हा अ ब क ड नुसार नाही असा उमेदवारांचा आक्षेप आहे. दरम्यान, पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक येणार निवडून येणार आहेत. पुण्यात चौरंगी लढत होणार आहे. महायुती मध्ये असणारे तिन्ही पक्ष वेगळेवेगळे लढत आहेत. भाजपला दोन्ही राष्ट्रवादीचे आव्हान आहेतर शिवसेना आणि काँग्रेस, उबाठा, मनसे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी ९३२ ठिकाणी ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत. त्यात ९०६ संंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. हेही वाचा : मतदानासाठी जाताना ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय; प्रभाग 2 नागपुरचाळ फुलेनगर येथील प्रकार समोर