Sonal Chauhan : अमेरिका आणि इस्त्राईलने संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ला केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यास इराण देखील जशास तसे प्रत्युत्तर दिल्याने संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. यामुळे युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झाली आहे. या हल्ल्याचा परिणाम विविध राष्ट्रांवर होणार असल्याचे सांगितले जात आहे. विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्याने याचा फटका भारतीय नागरिकांना बसला आहे. दुबईजवळ असलेल्या अमेरिकन सैन्याच्या तळावर हल्ले झाले आहेत. त्यामुळे दुबईत अनेक भारतीय नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. बॅालीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री देखील दुबईमध्ये अडकली असून, तिने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. अभिनेत्री सोनल चौहान दुबईमध्ये शुटिंगसाठी गेली असून, ती दुबई विमानतळावर अडकली आहे. तिने ट्वीट करत भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. तिने ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून आपण दुबईमध्ये अडकलो आहोत. इथं तणावपूर्ण परिस्थिती आहे, कोणतीही विमानं नाही. जी विमान उड्डाण करणार होती ती रद्द करण्यात झाली आहे. त्यामुळे भारतात परत येण्याचे मार्ग बंद झाले आहे. त्याामुळे भारत सरकाराने आम्हाला इथून बाहेर काढावं, अशी विनंती केली आहे. या मागणीला भारत सरकार काय प्रतिसाद देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. Hon’ble PM @narendramodi ji, I am currently stranded in Dubai due to the ongoing crisis, with flights cancelled and no clear way to return to India. I respectfully seek the Government’s guidance for a safe journey home Grateful for any support extended🙏🏻🇮🇳@MEAIndia @IndiainDubai — SONAL CHAUHAN (@sonalchauhan7) February 28, 2026 अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची दुबईला झळ पोहोचली आहे. दुबईमधून येणार जाणारे विमानं रद्द झाली आहे. लाखो प्रवासी दुबईमध्ये अडकली आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणाने इस्रायलवर मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले आहेत. खाड़ीतील अमेरिकी तळांवर (बहरीन, कुवेत, कतार, UAE) लक्ष्य करण्यात आले आहे. दुबई, अबुधाबी पर्यंत झळ बसली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, हल्ल्यात २०० हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती आहे. ७०० हून अधिक नागरिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. कोण आहे सोनल चौहान? सोनल चौहान बॅालीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २००८ मध्ये जन्नत या चित्रपटातून बॅालीवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेता इम्रान हाशमीसोबत तिने स्क्रिन शेअर केली होती. तिने मॉडेल म्हणून २००५ मध्ये मलेशियात ‘मिस वर्ल्ड टुरिझम’ चा पुरस्कार जिंकला होता. हेही वाचा : Israel Iran War : इराण-इस्रायल संघर्षाचा भडका; ५ देशांतील भारतीय दूतावासांकडून २४x७ हेल्पलाईन जारी