PM Modi In Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत,मनपा आणि पोलिसांकडून…

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणा-या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. 10 फेब्रुवारी म्हणजेच, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील.
सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे लाईनवरच वेगवान आणि आरामदायक प्रवासासाठी या रेल्वे बनविण्यात आल्या आहेत. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही पहिली सेमीस्पीड रेल्वे असेल. पूर्णपणे एसी, वायफाय, अद्ययावत सस्पेंशन, पूश बैक सीट्स अशी या रेल्वेची खासियत आहे.
अल जामिया विद्यापीठाचे उद्घाटन
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर मरोळमध्ये मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मरोळमध्ये मोठ्या संख्यामध्ये बोरी मुस्लिम समाज राहतो. बोरी मुस्लिम समाजाकडून मुंबईमध्ये पहिल्यांदा अल जामिया विद्यापीठाची स्थापना होत आहे. उद्या संध्याकाळी साडेचार वाजता पंतप्रधान विद्यापीठाचे उद्घाटन करतील.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/bombay-hc-dismisses-pil-seeking-action-against-vice-president-dhankhar-law-minister-rijiju/
पोलिसांसमोर आव्हान
मरोळ परिसर हा मोठा झोपडपट्टीच्या परिसर असल्यामुळे पोलिसांसमोर मोदींच्या दौऱ्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून 1000 जवानांची तुकडी मरोळमध्ये तैनात करण्यात आली आहे. यात मुंबई पोलिसांचे पाच डीसीपी, 200 अधिकारी, 800 अंमलदार मोदी यांच्या बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.





