पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा

Pm narendra modi spoke to us president donald trump on phone call : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
खुद्द पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती दिली. चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आणि जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी एकत्र काम करण्याच्या त्यांच्या सामायिक वचनबद्धतेवर भर दिला.
Delighted to speak with my dear friend President @realDonaldTrump @POTUS. Congratulated him on his historic second term. We are committed to a mutually beneficial and trusted partnership. We will work together for the welfare of our people and towards global peace, prosperity,…
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2025
पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले, “माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद झाला. त्यांच्या दुसऱ्या ऐतिहासिक कार्यकाळाबद्दल त्यांचे अभिनंदन. आम्ही परस्पर फायदेशीर आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र काम करू.
विजयानंतर पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील ही दुसरे दूरध्वनी संभाषण होते. ट्रम्प यांच्या विजयानंतर 6 नोव्हेंबर रोजी दोन्ही नेत्यांमध्ये पहिल्यांदा बोलणे झाले.





