PM Modi Poland Visit: पंतप्रधान मोदी पोहोचले पोलंडला; राष्ट्रपती, पंतप्रधानांची घेणार भेट

PM Modi Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त बुधवारी पोलंडमधील वॉर्सा येथे पोहोचले. यादरम्यान राजधानी वॉर्सामध्ये पंतप्रधान मोदींचे औपचारिक स्वागत करण्यात आले. गेल्या 45 वर्षात भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिलीच भेट असल्याची माहिती आहे. याआधी 1979 साली मोरारजी देसाई पोलंडला गेले होते.
पोलंडचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची घेणार भेट –
वॉर्सा येथे पंतप्रधान मोदी पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज सेबॅस्टियन डुडा आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी पोलंडमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाच्या लोकांनाही भेटू शकतात.
Prime Minister Narendra Modi arrives in Warsaw, Poland.
PM Modi is on a two-day official visit to Poland. This is the first visit by an Indian Prime Minister to Poland in the past 45 years.
(file pic) pic.twitter.com/i7tlxzzZbD
— ANI (@ANI) August 21, 2024
पोलंडनंतर पंतप्रधान मोदी जाणार युक्रेनला –
दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टला युक्रेनला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी चौथ्यांदा व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांची शेवटची भेट 14 जून 2024 रोजी इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत झाली होती. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात युद्धासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
यापूर्वी, पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, माझा पोलंड दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा आम्ही आमच्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण करत आहोत. पोलंड हा मध्य युरोपमधील प्रमुख आर्थिक भागीदार आहे. लोकशाही आणि बहुलवादासाठी आमची परस्पर वचनबद्धता आमचे संबंध अधिक मजबूत करते.





