वाह मोदीजी वाह, ह्यूस्टनमधील व्हिडिओ व्हायरल

ह्यूस्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या सात दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते ह्यूस्टनमध्ये दाखल झाले असून हाऊडी मोदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मोदी ह्यूस्टनमध्ये दाखल होताच असं काही घडलं कि त्यामुळे सोशल मीडियावर मोदींच कौतुक होत आहे.

पंतप्रधान मोदी ह्यूस्टनमध्ये दाखल झाल्यानंतर विमानतळावर त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. त्याचवेळी त्यातील एक फूल जमिनीवर पडल्याचं मोदींच्या लक्षात आलं. आणि त्यांनी स्वतः जमिनीवरील ते फुल उचललं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोदींच्या साधेपणाचं कौतुक होत आहे. पंतप्रधान असावेत तर असे, अशी भावना एका यूजरनं पोस्टमधून व्यक्त केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here