“‘मेक इन इंडिया’ ही ‘मेक फॉर द वर्ल्ड’ची सुरुवात” ; मारुती सुझुकी ईव्ही युनिटच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे विधान

PM Narendra Modi। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मारुती सुझुकीच्या ईव्ही युनिटचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी,भारताच्या ‘मेक इन इंडिया’ प्रवासातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असल्याचे वर्णन केले. तसेच त्यांनी, “आता भारत ‘मेक इन इंडिया’च्या पलीकडे जाऊन ‘मेक फॉर द वर्ल्ड’कडे वाटचाल करत आहे” असे म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी, “आपण एवढ्यावरच थांबणार नाही, तर भारत सेमी-कंडक्टर क्षेत्रात पुढे जात आहे, ज्याला आणखी पुढे नेले पाहिजे” असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यासोबतच त्यांनी पुढील आठवड्यात जपान दौऱ्याची घोषणाही केली.
पंतप्रधान मोदींनी यावेळी, “गणेश उत्सवाच्या उत्साहात आज भारत-जपान मैत्रीला एक नवीन आयाम मिळाला आहे”असे म्हणत दोन्ही देशातील व्यापार वाढीविषयी विश्वास व्यक्त केला. त्यांनी मारुतीच्या प्रवासाला “किशोरवयीन” वयाशी जोडले. तसेच ज्याप्रमाणे तरुणांची स्वप्ने किशोरावस्थेत उडतात, त्याचप्रमाणे मारुती सुझुकी आता ईव्ही क्षेत्रात नवीन पंख पसरवणार आहे. गुजरातमधील कंपनीचा हा नवा टप्पा उत्साह आणि उत्साहाने भरलेला आहे.” असे म्हटले.
पंतप्रधान मोदींनी आठवण करून दिली की २०१२ मध्ये, जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा या प्रकल्पासाठी जमीन देण्यात आली होती. त्यांचे स्वप्न स्वावलंबी भारत आणि ‘मेक इन इंडिया’ला बळकटी देण्याचे होते, जे आज प्रत्यक्षात येत आहे. ते म्हणाले की, भारतात लोकशाहीची शक्ती आहे आणि प्रतिभेचा प्रचंड साठा आहे, जो प्रत्येक देशासाठी “विन-विन” परिस्थिती निर्माण करतो.
‘वाहने आधीच जपानला निर्यात केली जाताय’ PM Narendra Modi।
पंतप्रधान मोदींनी,” सुझुकीने उत्पादित केलेली वाहने आधीच जपानला निर्यात केली जात आहेत आणि आता ईव्ही निर्यात देखील सुरू झाली आहे” असेही म्हणाले. त्यासोबतच पुढे त्यांनी, “मारुती सुझुकी सलग चार वर्षांपासून भारतातील सर्वात मोठी निर्यातदार आहे आणि आता डझनभर नवीन ईव्ही कार परदेशात धावतील, ज्यावर मेक इन इंडिया लिहिलेले असेल” असेही त्यांनी यावली म्हटले
Made in India electric vehicles are now driving onto the global stage. It reflects our nation’s growing strength in green mobility. Addressing a programme in Hansalpur, Gujarat. https://t.co/sZZ7ZCSys1
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2025
‘मारुती सुझुकी मेक इन इंडियाची ब्रँड अॅम्बेसेडर’ PM Narendra Modi।
मारुती सुझुकीला ‘मेक इन इंडिया’ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून वर्णन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कंपनीने केवळ देशांतर्गत पातळीवरच नव्हे तर जागतिक स्तरावरही भारताची ओळख मजबूत केली आहे. त्यांनी हा प्रसंग भारत-जपान मैत्री आणि सामायिक प्रगतीचे प्रतीक म्हणून वर्णन केला.
‘आपण इथेच थांबणार नाही…’
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपण इथेच थांबणार नाही, आपण सेमी-कंडक्टर क्षेत्रात पुढे जात आहोत ज्याला आणखी पुढे नेण्याची गरज आहे. आम्हाला ऑटो उद्योगाच्या समस्यांची जाणीव आहे. यासाठी देशातील वेगवेगळ्या ठिकाणी महत्त्वाच्या खनिजांसाठी शोध मोहिमा राबवल्या जातील. मी पुढच्या आठवड्यात जपानला जात आहे. आमचे सांस्कृतिक संबंध आहेत. मारुतीपासून सुरू झालेला प्रवास आता बुलेट ट्रेनपर्यंत पोहोचला आहे. गुजरात-जपान संबंध २० वर्षांपूर्वी येथून सुरू झाले होते.”





