आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या मराठीतून शुभेच्छा; म्हणाले “या उत्सवामुळे…”

PM Narendra Modi on Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. वारकऱ्यांची पायी वारी अखेर पंढरपुरातील पांडुरंगाच्या चरणी लीन झाली.
आषाढी एकादशीनिमित्त पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देण्यासाठी आपल्या अधिकृत X वर पोस्ट करत लिहिले की, “आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे”, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून केली आहे. PM Narendra Modi on Ashadhi Ekadashi |
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची…
— Narendra Modi (@narendramodi) July 17, 2024
नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंबाला महापूजेचा मान
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंब यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी झाले. गेल्या १६ वर्षांपासून अहिरे कुटुंब नित्यनियमानं पंढरीची वारी करतंय आहे. बाळू शंकर अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मनोभावे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत, असं विठुरायाचरणी साकडं घातल्याचं माध्यमांसोबत बोलताना सांगितले. PM Narendra Modi on Ashadhi Ekadashi |
हेही वाचा:
रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढणार? ; ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल





