नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले आहे. त्यातच आता पंप्रधान मोदींसाठी चिंतेची बातमी समोर येत आहे. पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रल्हाद मोदी हे मूत्रपिंडासंबंधित आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रल्हाद मोदी पंतप्रधान मोदी यांचे लहान भाऊ आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांना किडनीशी संबंधित उपचारांसाठी सध्या चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात किडनी संबंधित आजारावर उपचार सुरु आहेत. प्रल्हाद मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत. ते अहमदाबादमध्ये वास्तव्यास असून याठिकाणी त्यांचे किराणा मालाचे दुकान आणि टायरचे शोरूम आहे.
प्रल्हाद मोदी 2018 साली चर्चेत आले होते. त्यांनी गुजरातमध्ये आंदोलन केले होते. गुजरात फेअर प्राइज शॉप आणि केरोसिन लायसेंस होल्डर्स यांच्यामध्ये वाद झाला होता. हा वाद निवळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर प्रल्हाद मोदी यांनी बंद पुकारला होता, त्यावेळी ते गुजरात फेअर प्राइज शॉप ओनर्सचे अध्यक्ष होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबात एकूण पाच भावंडं आहेत. त्यापैकी एक बहीण आणि चार भाऊ आहेत. सोमा मोदी, अमृत मोदी, नरेंद्र मोदी, प्रल्हाद मोदी, पंकज मोदी आणि एक बहीण वासंती मोदी. पंतप्रधानांच्या मोठ्या भावाचं नाव सोमा मोदी आहे. ते आरोग्य विभागातून निवृत्त झाले असून अहमदाबादमध्ये वृद्धाश्रम चालवतात.