PM Modi writes to PR Sreejesh : पॅरिस ऑलिम्पिकनंतर स्पर्धात्मक हॉकीला अलविदा करणारा भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेले पत्र सोशल मीडियावर शेयर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रातून खेळातील योगदानासाठी श्रीजेशचे कौतुक करताना, तो राष्ट्रीय कनिष्ठ प्रशिक्षक म्हणून श्रीजेश प्रभावी कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदक मिळविले होते. स्पर्धेनंतर लागेलच श्रीजेशने निवृत्ती जाहीर केली होती. भारताची ‘द वॉल’ या नावाने हॉकीमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्रीजेशने आशियाई क्रीडा स्पर्धेतही दोन सुवर्णपदके आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन रौप्यपदके पटकावली आहेत. निवृत्तीनंतर हॉकी इंडियाने श्रीजेशची नियुक्ती राष्ट्रीय कनिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून केली.
नवीन भूमिकेत तुमचे कार्य हे तितकेच प्रभावी आणि खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करताना, तुम्ही खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी तुमच्या अफाट योगदानाची मनापासून प्रशंसा करतो, असे म्हटले.
‘अशा असंख्य आठवणी आहेत आणि त्यांच्यासाठी एक पत्र पुरेसे नाही. तुम्हाला मिळालेले विविध पुरस्कार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके तुम्ही कोणत्या उंचीला स्पर्श केला आहे हे दर्शविते. पण असे असूनही, मैदानावर आणि मैदानाबाहेर तुमची नम्रता आणि प्रतिष्ठा वाखाणण्याजोगी आहे. या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीजेशचे कौतुक केले.
Received this heart-warming letter from @narendramodi Sir on my retirement.
Hockey is my life and I’ll continue to serve the game and work towards making India a power in hockey, the start of which has been made with the 2020, 2024 Olympic medals.
Thank You PM Sir for your… pic.twitter.com/vWmljOJ203— sreejesh p r (@16Sreejesh) September 11, 2024
‘मला विश्वास आहे की तुमची तळमळ, वचनबद्धता आणि समर्पण विश्वविजेत्यांची पुढची पिढी घडवेल, तुमच्या अथक समर्पणाबद्दल, गौरवशाली कारकीर्दीबद्दल आणि भारताला अभिमान वाटावा यासाठी मी तुमचा आभारी आहे. या सर्व आठवणींसाठी धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा., असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात म्हटले आहे.
मी हॉकीची सेवा करत राहील…
माझ्या निवृत्तीचे बद्दलचे नरेंद्र मोदी सरांचे पात्र मिळाले. हॉकी हे माझे जीवन असून मी या खेळाची सेवा करत राहणार आहे. भारताला हॉकीत महासत्ता बनविण्यासाठी मी सातत्याने कार्यरत राहणार आहे, माझ्यावर दाखविलेल्या विश्वासासाठी पंतप्रधान सरांचे मनापासून आभार, असे श्रीजेशने एक्सवर लिहिले आहे.