नवी दिल्ली – देशभरात रामनवमी हा पवित्र सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देखील रामनवमीच्या जोरदार तयारी करण्यात आली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखाल रामनवमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि सर्व लोकांना त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भगवान रामाच्या आदर्शांचे पालन करण्यास सांगितले.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत लिहिले की, ‘रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना खूप शुभेच्छा. त्याग, तपस्या, संयम आणि संकल्प यावर आधारित मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचे जीवन प्रत्येक युगात मानवतेचे प्रेरणास्थान राहील.’
रामनवमी के पावन-पुनीत अवसर पर समस्त देशवासियों को अनेकानेक शुभकामनाएं। त्याग, तपस्या, संयम और संकल्प पर आधारित मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र का जीवन हर युग में मानवता की प्रेरणाशक्ति बना रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2023
तर द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ‘रामनवमीच्या सर्व देशवासियांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्याग आणि सेवेचा अनमोल संदेश मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या चरित्रातून मिळतो. सर्व देशवासीयांनी भगवान रामाचे उच्च आदर्श आत्मसात करावे आणि गौरवशाली भारताच्या उभारणीसाठी स्वतःला समर्पित करावे ही माझी सदिच्छा आहे.’
राम नवमी पर सभी देशवासियों को मेरी हार्दिक शुभकामनाएं। मर्यादा पुरूषोत्तम श्री राम के चरित से त्याग व सेवा का अमूल्य संदेश मिलता है। सभी देशवासी, प्रभु राम के उच्च आदर्शों को आचरण में ढालें और एक गौरवशाली भारत के निर्माण के लिए स्वयं को समर्पित करें, ऐसी मेरी मंगलकामना है।
— President of India (@rashtrapatibhvn) March 30, 2023
त्याचवेळी अयोध्येत रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून प्रभू रामाच्या मंदिरात रामजन्मोत्सवाला सुरुवात होणार आहे. यासाठी रामाचे मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. रामनवमीमुळे अयोध्या आणि परिसरात सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.