पंतप्रधान मोदींनी केदारनाथ आणि बद्रीनाथाचे घेतले दर्शन; 3,400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची केली पायाभरणी

डेहराडून – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ आणि बद्रीनाथ तीर्थस्थळांना भेट देऊन तेथे पूजा आणि प्रार्थना केली. प्रथम रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधान हेलिकॉप्टरमधून चमोली येथील बद्रीनाथ मंदिरात पोहोचले. पंतप्रधानांनी स्थानिक डोंगरी लोकांचा पांढरा पारंपरिक पोशाख परिधान करून त्यावर मंदिरांमध्ये “पूजा” केली.
केदारनाथ येथे त्यांनी गौरीकुंड-केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणीही केली. रोपवेचा वापर करून भाविक गौरीकुंड येथून केवळ काही मिनिटांत मंदिरापर्यंत पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे भाविकांची चांगली सोय होणार आहे. पंतप्रधानांनी येथील आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधी स्थळालाही भेट दिली आणि तेथे काही काळ घालवला.
भूवैण्ठकृतावासं, देवदेवं जगत्पतिम्।
चतुर्वर्गप्रदातारं, श्रीबद्रीशं नमाम्यहम्।।
Prayed at Badrinath. pic.twitter.com/g8Y39w5K0a
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2022
दुपारी, त्यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांसाठी 3,400 कोटी रुपयांच्या नवीन रस्ते आणि रोपवे प्रकल्पांची पायाभरणी केली. अरायव्हल प्लाझा आणि परिसरातील तलावांच्या सुशोभिकरण प्रकल्पाच्या प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान बद्रीनाथ येथे मुक्कमाला आहेत. पंतप्रधान झाल्यापासून मोदींची केदारनाथची ही सहावी आणि बद्रीनाथची दुसरी भेट आहे.
Earlier today, I went to the Sri Adi Shankaracharya Samadhi. I also had the opportunity to interact with the Shramjeevis working on the restoration work in Kedarnath. pic.twitter.com/82pMFfM1Jb
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2022





