अहमदाबादमधील ‘सरदारधाम’चे मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
Updated On:

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेल्या सरदारधाम प्रकल्पाचे येत्या 11 सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन होणार आहे. त्याचवेळी त्यांच्या हस्ते सरदारधाम फेज 2 च्या कन्या छात्रालय म्हणजेच गर्ल्स हॉस्टेलच्या कामाचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार आहे.
11 सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता हे दोन्ही कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयामार्फत देण्यात आली. सरदारधाम भवनमध्ये विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून कन्या छात्रालयात गरीब वर्गातील दोन हजार मुलींची निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.





