PM Modi Talk To Venezuela Acting President: पंतप्रधान मोदींची व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा; नवीन अध्यायाची सुरुवात
PM Modi Talk To Venezuela Acting President : अमेरिकेच्या लष्करी कारवाईदरम्यान व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करण्यात आले होते.

PM Modi Talk To Venezuela Acting President : अमेरिकेच्या लष्करी कारवाईदरम्यान व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करण्यात आले होते. याचदरम्यान आता व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. व्हेनेझुएलाच्या राजकारणात भूकंप झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदांनी भारत तुमच्या सोबत असल्याची भावना व्यक्त केली.
भारताचे पंतप्रधान मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यातील हे पहिलेच अधिकृत संभाषण आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या फोन कॉलची माहिती पंतप्रधानांनी X वर शेअर केली आहे.
नेमकी काय झाली चर्चा?
यात मोदींनी म्हटले की, दोन्ही देशांनी द्विपक्षीय भागीदारीला नवीन उंचीवर नेण्याचे मान्य केले आहे. भारतासाठी व्हेनेझुएला हा केवळ व्यापारी भागीदार नाही तर ऊर्जा सुरक्षेचा एक प्रमुख स्रोत आहे. या कॉलच्या माध्यमातून मादुरो यांती सत्ता गेल्यानंतर भारताने नवीन सरकारसोबत संतुलित संवाद साधून दोन्ही देशांमधील हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला आहे.
भारत सरकारने या दोन्ही नेत्यांच्या फोन कॉलनंतर एक प्रेस रिलीज जारी केले आहे. या कॉलमुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांमध्ये एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा सुरक्षा यासारख्या धोरणात्मक क्षेत्रात त्यांची भागीदारी आणखी मजबूत करण्याचे मान्य केले. तसेच डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य, शेती आणि सांस्कृतीक सलोख जपण्याचा संकल्प केला.
प्रेस रिलीजमध्ये ग्लोबल साउथमधील विकसनशील देशांमधील एकतेवर भर देण्यात आला. तसेच भारत आणि व्हेनेझुएला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर एकमेकांना पाठिंबा देतील. तसेच बदलत्या जागतिक परिस्थितीत दोन्ही सतत संवाद साधतील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अमेरिका-व्हेनेझुएलामध्ये वाद कशामुळे?
अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश असलेल्या व्हेनेझुएलाचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणले गेले आहेत. व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यादरम्यान त्यांनी व्हेनेझुएलावर अनेक निर्बंधदेखील लादले आहेत.
गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा दिला होता. दुसरीकडे, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे ड्रग्ज तस्करीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. PM Modi Talk To Venezuela Acting President
हेही वाचा:
Stress & Obesity: स्ट्रेसमुळे वजन का वाढतं? जाणून घ्या इमोशनल ईटिंगमागचं संपूर्ण शास्त्र





