Pm Modi South Africa Visit। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २० व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग याठिकाणी २१ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ही शिखर परिषद होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने आयोजित केली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे, आफ्रिकन खंडात होणारी ही सलग चौथी G20 शिखर परिषद आहे. ग्लोबल साउथमध्ये होणारी ही सलग चौथी G20 शिखर परिषद आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून दौऱ्यावर निघताना पंतप्रधान मोदी यांनी, ही शिखर परिषद अनेक प्रकारे महत्त्वाची आहे. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात (२०२३) आफ्रिकन युनियनला G20 चे कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात आले होते आणि आता आफ्रिकेत ही शिखर परिषद आयोजित केल्याने त्या ऐतिहासिक पायरीला आणखी बळकटी मिळते याची आठवण त्यांनी करून दिली. या वर्षीच्या G20 शिखर परिषदेची थीम काय आहे? Pm Modi South Africa Visit। या वर्षीच्या G20 शिखर परिषदेची थीम ‘एकता, समानता आणि शाश्वतता’ आहे. ही थीम भारत आणि ब्राझीलमध्ये झालेल्या मागील दोन शिखर परिषदेची सातत्यता पुढे नेत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते ‘वसुधैव कुटुंबकम’ – एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या तत्वज्ञानावर आधारित शिखर परिषदेत भारताचे दृष्टिकोन सादर करतील.” पंतप्रधान मोदी भारतीय वंशाच्या लोकांशी भेटतील Pm Modi South Africa Visit। शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदी सहाव्या IBSA (भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका) शिखर परिषदेला देखील उपस्थित राहतील. येथे धोरणात्मक सहकार्य, जागतिक आव्हाने, आर्थिक भागीदारी आणि तीन देशांमधील विकास अजेंडा यावर चर्चा केली जाईल. दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाची लोकसंख्या मोठी आहे आणि पंतप्रधान मोदी म्हणाले की ते जगातील सर्वात मोठ्या भारतीय डायस्पोरा गटांपैकी एक असलेल्या तेथील भारतीय समुदायाला भेटण्यास उत्सुक आहेत.