पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात ; पंतप्रधान म्हणाले,”मतदानात उत्साहाने सहभागी व्हा”

PM Modi on Voting। लोकसभा निवडणूक 2024 आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर फक्त दोन टप्पे उरले आहेत. दरम्यान, पाचव्या टप्प्यातील आजच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 8 राज्यांतील 49 जागांवर मतदान सुरू झाले आहे.
मतदानात उत्साहाने सहभागी व्हा PM Modi on Voting।
पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी पीएम मोदींनी ट्विट केले. यामध्ये, आ”ज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मतदान करावे आणि मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. लोकशाहीच्या या उत्सवात महिला आणि तरुण मतदारांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे माझे विशेष आवाहन आहे.” असे त्यांनी म्हटले.
As 49 seats across 8 states and UTs go to the polls today in the 5th phase of the 2024 Lok Sabha elections, urging all those whose constituencies are polling today to vote in record numbers. I specially call upon women voters and young voters to exercise their franchise.
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2024
8 राज्यांतील 49 जागांवर मतदान PM Modi on Voting।
देशातील सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ४९ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात राहुल गांधी, राजनाथसिंह, पीयूष गोयल, स्मृती इराणी, चिराग पासवान अशा दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद होणार आहे. एकूण सात टप्प्यांमधील सर्वांत कमी मतदारसंघ याच टप्प्यात आहेत.





