PM Modi On Opposition: गेल्या १२ वर्षांत पहिल्यांदाच केंद्र सरकारचे एक महत्त्वाचे विधेयक लोकसभेत नामंजूर झाले आहे. महिला आरक्षण विधेयकामुळे केंद्र सरकार निराश झाले होते. विरोधी पक्षांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते. विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने विरोधी पक्षांचा विरोध केला. दुसऱ्याच दिवशी, १८ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांच्या भूमिकेचा विरोध केला. समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी , महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यास विरोधी पक्षांनी दिलेला नकार ही एक चूक होती, ज्याची त्यांना भविष्यात राजकीय किंमत मोजावी लागेल. ते म्हणाले की, या भूमिकेसाठी विरोधी पक्षांना राजकीय किंमत मोजावी लागेल.” असे म्हणत थेट हल्लाबोल केला आहे. PM Modi On Opposition: महिलांप्रति विरोधी पक्षांची वृत्ती नकारात्मक आहे, हा संदेश देशातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवला पाहिजे, यावर पंतप्रधानांनी जोर दिला. ते असेही म्हणाले की, विरोधी पक्ष आता आपली भूमिका योग्य ठरवण्याचा आणि लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. PM Modi On Opposition: दरम्यान , नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले आहे. तब्बल 12 वर्षांनी मोदी सरकारला लोकसभेत पहिल्यांदा मोठा धक्का बसलाय. एवढंच नाही तर महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्र शासित प्रदेश सुधारणा विधेयक माघार घेण्याची नामुष्की मोदी सरकारवर ओढवली आहे. त्यानंतर लोकसभेत 528 सदस्यांनी मतदान केलं. त्यात विधेयकाच्या बाजूने 298 तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडले. तर 12 सदस्य अनुपस्थित होते. त्यामुळे बहुमतासाठी 352 मतं आवश्यक होती. मात्र मोदी सरकार दोन तृतियांश बहुमत मिळवण्यात अपयशी ठरलं. PM Modi On Opposition: यानंतर राहुल गांधींनी तर थेट वर्मावरच बोट ठेवलंय. हे विधेयक महिला आरक्षणाचं नाही तर घटना पायदळी तुडवणारं होतं, अशा शब्दात राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी हल्लाबोल केलाय. दुसरीकडे विरोधकांनी महिलांचा अपमान केल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केलीय.