पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली ; जुन्या आठवणींना दिला उजाळा

Pm Modi on Manmohan sing। माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर केवळ भारतच नाही तर जगभरातील लोकांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यानंतर आज डॉ. सिंग यांच्या घरी जाऊन पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मोदी त्यांच्या ३ मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांच्या आधी गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते.
#WATCH | Delhi | PM Narendra Modi pays last respects to late former PM Dr Manmohan Singh and offers condolences to his family pic.twitter.com/7vn1PB1Xdj
— ANI (@ANI) December 27, 2024
मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.
#WATCH | Delhi | Union Home Minister Amit Shah pays last respects to former PM Dr Manmohan Singh who passed away last night
(Source: DD) pic.twitter.com/nX8rnb1Yu6
— ANI (@ANI) December 27, 2024
पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेत्याच्या बुद्धिमत्तेची आणि नम्रतेची प्रशंसा केली आणि त्यांच्यासोबतच्या संभाषणाची छायाचित्रेही शेअर केली.
#WATCH | Union Minister JP Nadda pays final respect to former PM Dr Manmohan Singh, at latter’s residence in Delhi. pic.twitter.com/65RoCUTEgs
— ANI (@ANI) December 27, 2024
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना, “या दु:खाच्या घडीमध्ये मी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांसोबत, त्यांच्या मित्रांसोबत आणि असंख्य चाहत्यांसोबत संवेदना व्यक्त करतो. ओम शांती. भारताने आपले सर्वात आदरणीय नेते डॉ.मनमोहन सिंग गमावले आहेत. सामान्य पार्श्वभूमीतून उठून त्यांनी सन्माननीय अर्थतज्ञ म्हणून आपला ठसा उमटवला. त्यांनी अर्थमंत्र्यांसह सरकारमधील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आणि आमच्या आर्थिक धोरणावर त्यांनी खोल छाप सोडली. पंतप्रधान असताना त्यांनी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी खूप प्रयत्न केले.” असे त्यांनी म्हटले.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग आणि मी नियमितपणे बोलायचो. शासनाशी संबंधित विविध विषयांवर आमची व्यापक चर्चा व्हायची. त्यांची बुद्धी आणि नम्रता नेहमीच दिसून आली. ”असे त्यांनी म्हटले.
त्यासोबतच “संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही व्यावहारिक होता. आमचे पंतप्रधान म्हणून त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.” गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान असताना सिंग यांच्याशी झालेल्या संभाषणाची आठवण करून देताना मोदी म्हणाले की, त्यांच्यात राज्यकारभाराशी संबंधित विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा होत असे.
मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) अंतर्गत आघाडी सरकारचे नेतृत्व करत सलग दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केले. पीव्ही नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून ते 1991 मध्ये भारताच्या आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार होते.





