पंतप्रधानांच्या भेटीने जागतिक मुष्टियोद्धा भारावली
Updated On:

नवी दिल्ली – भारताची जागतिक मुष्टियुद्ध विजेती निखत झरीन हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तिच्यासह मनीष मौन व परवीन हुडा यांनीही पंतप्रधानांशी संवाद साधला. जागतिक विजेतेपदाबद्दल मोदी यांनी निखतचे अभिनंदन केले व या सर्वांना आगामी काळातही असेच यश मिळवा, अशा शब्दात कौतुकही केले.
तुर्कीमध्ये झालेल्या विश्वकरंडक मुष्टियुद्ध स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवलेल्या निळकतने यंदाच्या जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत फ्लायवेट प्रकारात 52 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावताना नवा इतिहास रचला होता.
थायलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत यजमान देशाच्या जीतपॅंग जुतामसला निखतने 5-0 असे पराभूत करत विश्वविजेतेपद पटकावले होते. त्यानंतर मायदेशी परतल्यावर या खेळाडूंनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.





