नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी आज नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले. रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचेही उद्घाटन पंतप्रधानांनी केले. याशिवाय, प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना – एक राष्ट्र एक खत या डोजनेचा प्रारंभ पंतप्रधानांनी केला. थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता देखील पंतप्रधानांनी ( PM Modi ) जारी केला आणि कृषी स्टार्टअप परिषदेचे उद्घाटनही केले.
आज उद्घाटन करण्यात आलेली 600 हून अधिक प्रधानमंत्री समृद्धी केंद्रे केवळ खत विक्री केंद्रे नसून देशातील शेतकऱ्यांशी घट्ट नाते निर्माण करणारी यंत्रणा आहे असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना – एक राष्ट्र एक खत आज सुरू केली आहे. भारत ब्रॅंडचे स्वस्त दर्जाचे खत शेतकऱ्यांना मिळण्याची सुनिश्चिती करणारी ही योजना आहे असे पंतप्रधान म्हणाले.
राष्ट्रवादीचे अजित पवार पुन्हा ईडीच्या रडारवर? 25 हजार कोटींचा घोटाळा प्रकरण
नॅनो युरिया हे कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचे माध्यम आहे. युरियाच्या भरलेल्या एका पोत्याची क्षमता आता नॅनो युरियाच्या एका बाटलीत आहे. यामुळे युरियाच्या वाहतूक खर्चात लक्षणीय घट होईल. आता देशात विकले जाणारे युरिया “भारत’ या एकाच नावाचे ओळखले जाईल. त्यामुळे खतांच्या किमती कमी होऊन त्यांची उपलब्धता वाढेल, असेही ते म्हणाले.