“कुणी मला ‘मौत का सौदागर’ म्हटलं, तर कुणी गंदी नाली का…” ; विरोधकांच्या टीकेवर पंतप्रधान संतापले

PM Modi in Interview । देशात लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलीय. आता सर्वांच लक्ष 4 जूनच्या निकालाकडे लागलंय. देशाचा नवा पंतप्रधान कोण? असणार याची उत्सुकता सर्वांचा आहे. यंदाही भाजप हॅट्रिक करणार की, विरोधक बाजी मारणार? हाच प्रश्न सर्वांच्या समोर आहे. दरम्यान, या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला खरा पण मुलाखती दरम्यान, पंतप्रधान भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी,”संसदेत आमच्या एका सहकाऱ्यानं 101 अपशब्द माझ्यासाठी बोलले होते. त्यामुळे निवडणुका असो वा नसो, हे लोक (विरोधक) मानतात की, त्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते वैतागले आहेत. सातत्यानं अपशब्द वापरणं त्यांच्या स्वभाव बनलाय .”असे त्यांनी म्हटले. तसेच पुढे भावूक होऊन मोदी म्हणाले ,” कोणी मला मौत का सौदागर म्हणालं, तर कोणी मला गंदी नाली का किडा म्हटलं. शिवीगाळ करणं ही विरोधकांची मानसिकता, पण मी तब्बल 24 वर्षांपासून हे सर्व सहन केल्यानंतर मला आता याचा अजिबात फरक पडत नाही,” असं त्यांनी म्हटलं.
#WATCH | On the Opposition’s allegation that ED, CBI and IT are being used to suppress them, PM Modi says “Ask the person who is throwing this garbage, what is the proof of what you are saying?…I will convert this garbage into manure and will produce some good things for the… pic.twitter.com/FInIjGzlLb
— ANI (@ANI) May 28, 2024
बंगालमधील निवडणूक एकतर्फी होणार PM Modi in Interview ।
पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले की, टीएमसी बंगालच्या निवडणुकीत अस्तित्वासाठी लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तीन जागांवर होतो आणि बंगालच्या लोकांनी आम्हाला 80 पर्यंत नेलं. गेल्या निवडणुकीत आम्हाला प्रचंड बहुमत मिळालं. या वेळी, संपूर्ण भारतात सर्वोत्तम कामगिरी करणारं कोणतंही राज्य असेल तर ते पश्चिम बंगाल असेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळत आहे. तेथील निवडणूक एकतर्फी आहे.असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना पंतप्रधानांनी,”मुस्लिमांसाठी ओबीसी कोट्याबाबत कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशावर आणि त्यानंतरच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर ममता बॅनर्जींच्या प्रतिक्रियेवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, (कोलकाता) उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर एवढी मोठी फसवणूक होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण त्याहून दुर्दैवी बाब म्हणजे, आता ते व्होट बँकेच्या राजकारणासाठी न्यायव्यवस्थेचाही गैरवापर करत आहेत. ही परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही.
केजरीवालांनी संविधान वाचावं PM Modi in Interview ।
आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल ज्यावेळी तुरुंगातून बाहेर आले, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत म्हटलेलं की, कोण तुरुंगात जाईल हे पंतप्रधानच ठरवतात. यावर पंतप्रधान मोदींनी जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी म्हणाले की, या लोकांनी संविधान वाचलं तर बरं होईल.
‘ईडीने 10 वर्षांत 2200 कोटी पकडले’
यावेळी पंतप्रधान म्हणाले, ‘एकेकाळी मनमोहन सिंग यांचे सरकार होते. 34 लाख रुपये जप्त करण्यात आले. 34 लाख रुपये म्हणजे ते स्कूल बॅगमध्ये बसू शकते. सध्या ईडीने 10 वर्षात 2200 कोटी रुपये जप्त केले आहेत. हे टीव्हीवर नक्कीच पाहायला मिळते. ज्याने 2200 कोटी रुपये देशाला परत आणले त्याचा आदर केला पाहिजे की बदनामी केली पाहिजे. ज्याचे पैसे गेले तो शिवीगाळ करतो. ज्याच्या खिशातून 2200 कोटी रुपये घेतले, तो ज्याने चोरी करून गोळा केला तो पकडला गेला, अशी ओरड होत आहे. याचा अर्थ जे चोर पकडले जात आहेत, जो कोणी यात सामील आहे ते ओरडत आहेत.” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.





