‘हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करा’, पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या नव्या सरकारला दिला स्पष्ट संदेश

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांचे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. बांगलादेशमध्ये लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.
My best wishes to Professor Muhammad Yunus on the assumption of his new responsibilities. We hope for an early return to normalcy, ensuring the safety and protection of Hindus and all other minority communities. India remains committed to working with Bangladesh to fulfill the…
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2024
बांगलादेशात लवकरच परिस्थिती पूर्ववत व्हावी : पंतप्रधान मोदी
पीएम मोदी म्हणाले, प्रोफेसर मुहम्मद युनूस यांना नवीन जबाबदारी स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा. आम्हाला आशा आहे की बांग्लादेशमध्ये लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल आणि तेथील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल. आपल्या दोन्ही देशांच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत बांगलादेशसोबत काम करण्यासाठी वचनबद्ध आहे.
नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी गुरुवारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदाची शपथ घेतली आहे. 84 वर्षीय युनूस यांना बंगभवन येथे एका समारंभात राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पदाची शपथ दिली. युनूस यांनी शेख हसीनाच्या देशातून निघून जाण्याला दुसरे स्वातंत्र्य असे वर्णन केले.





