PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता येत्या शनिवारी जमा केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. शिवराज चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. देशभरातील 731 कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि प्रमुख व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते. 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 3.69 लाख कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत. 20 व्या हप्त्यात 9.7 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,500 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.