एसटीचे “शेड’ गायब झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

नेवासा – बहुजन हिताय..बहुजन सुखाय…हे बीद्र वाक्य घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी एस.टी.महामंडळाचे अविरत कार्य सुरू आहे. सद्यस्थितीत बस थांब्यासह थेड गायब झाल्यामुळे ऊन, वारा, पावसात “लालपरी’ची प्रवाशांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळे गावोगावी बस थांबे उभारण्याची गरज आहे.
“लालपरीला’ खासगी प्रवासी वाहतुकीचे मोठे आवाहन असताना महिलांना पन्नास टक्के प्रवास मोफत करून राज्य सरकारने मोठा धाडसी निर्णय घेतलेला आहे. 75 वर्ष पूर्ण झालेल्यांना राज्यभर प्रवास मोफत केला आहे.
एस.टी.प्रवासावर आजही प्रवाशांचा मोठा विश्वास असून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांजवळ प्रवासी एसटीची वाट पहात ताटकळत उभे रहात असतात. महामंडळाने केलेले बसथांबे अतिक्रमात गायब झाल्यामुळे सध्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवासीवर्ग बसची वाट पहाण्यासाठी बसायला जागा नसल्यामुळे मोफत प्रवास सोडून खासगी वाहनांच्या गाड्यात प्रवास करताना दिसून येत आहे.
एस.टी.महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या एसटी बसथांब्यामध्ये प्रवास करण्यासठी शेडची उभारणी करणे गरजेचे आहे. बसशेडची उभारणी केल्यास पुन्हा एकदा लालपरीतील प्रवास सुखकर होऊन प्रवाशांच्या हालअपेष्टा थांबण्यास मदत होईल. त्यादृष्टीने महामंडळाने पुढाकार घेऊन गायब झालेले बसशेड उभारण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.
एस.टी.महामंडळाने प्रवाशांसाठी चांगल्या योजना आखलेल्या आहेत. प्रवासी एस.टी शिवाय प्रवासच करत नाही. अनेक बस थांब्यावर बसशेड नाही. या बसशेड उभारणीसाठी लढा उभारला जाईल
अनिल ताके पाटील
नेवासा तालुका प्रवासी संघटना अध्यक्षप्रवाशांच्या सोयीसाठी एस.टी. असून सुखकर प्रवास देण्यासाठी महामंडळाकडून नेहमीच शर्थीचे प्रयत्न सुरू असतात. बसशेड तालुक्यात नाहीत, ही वास्तव परिस्थिती आहे. याकडे सरकारने लक्ष घालण्याची गरज असून ही सेवा अधिक सुलभ आणि चांगली होऊन प्रवासी या सेवेकडे वळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू.
रामनाथ मगर
आगार प्रमुख, नेवासा





