पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून गुजरातेतून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक आहेत. मात्र हार्दिक पटेल यांच्यावर २०१५मध्ये करण्यात आलेल्या पाटीदार आंदोलनादरम्यान हिंसा भडकविण्याचा आरोप सिद्ध झाला असल्याने त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार लोकसभेची निवडणूक लढवता येणार नाहीये.
दरम्यान, हार्दिक पटेल यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यासाठी ४ एप्रिल ही शेवटची तारीख असल्याने आपण दाखल केलेल्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने त्वरित सुनावणी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
Patidar leader Hardik Patel moves Supreme Court seeking suspension of sentence and conviction against him in the case in which he was found guilty of rioting and arson during the Patidar quota stir of 2015. (File pic) pic.twitter.com/McmfzQk1ik
— ANI (@ANI) April 1, 2019