‘PUB-G’ खेळणं बेतलं जीवावर ; रेल्वेच्या धडकेत तिघांचा दुर्देवी मृत्यू

बिहारः आजवर गेमच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. विशेषवरून पब्जी गेम खेळण्याच्या नादात अनेकांचा अपघाताने मृत्यू झाल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत. बिहारमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. बिहारमधील पंचारण जिल्ह्यातील मानसा टोलाजवळ काही तरुण मोबाईलवर पब्जी गेम खेळत असताना त्यांना रेल्वे रुळावरून येत आहे. हे देखील कळले नाही. यामुळे रेल्वेने दिलेल्या धडकेत तीन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना मुफसिल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नरकटियागंज-मुझफ्फरपूर रेल्वे सेक्शनवर या ठिकाणी घडली.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण रेल्वेच्या रुळावर बसून मोबाईलमध्ये पब्जी ही गेम खेळण्यात व्यस्त होती. त्यांना रेल्वे येत असल्याचे भानच राहिले नाही आणि अपघाताची घटना घडली. या अपघातात गुमटी येथील फुरकान आलम, बारी टोला येथील समीर आलम आणि हबीबुल्ला अन्सारी अशी मयत तरुणांची नावे आहेत. या दुर्घटनेनंतर घटनास्थळावरून मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. या घटनेने स्थानिक रहिवाशांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पीडित कुटुबांनी अत्यंसंस्कार करण्यासाठी मृतदेह नेले आ्हेत. या अपघाताच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. रेल्वे रुळावर बसून हे तरुण मोबाईलवर गेम खेळत असल्याचे तपासात उघड झाले आहे. अशा प्रकाराच्या घटनामुळे गेम खेळण्याच्या धोक्याबाबातही चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच मुलांच्या गेमिंगच्या सवयीबद्दल पालकांनी जागरुक राहण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) विवेक दीप यांनी केले आहे.




