सासवड- सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग व सर्वसामान्य जनता आर्थिक बाजूने ढासळलेली आहे. केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत. याचा निषेध म्हणून तसेच राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसाठी पुरंदर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सासवड बसस्थानकात “डफली बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली हे आंदोलन करून सासवड आगारप्रमुख मनीषा इनामके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे, पुरंदर-हवेली विधानसभा अध्यक्ष जयपाल यादव, श्याम माने, विकास ढगारे, स्वप्नील अढागळे, नवनाथ लोखंडे, समीर नेटके, सुरज धेंडे, अनिल धिवार, आसिफ शेख, विनोद शेगर, स्वप्नील पवार, दत्ता शिंदे, अनिल सावंत, विश्वनाथ शेगर, अरुण शिंदे, सोपान कोंढाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.