मुंबई – अर्जेंटिनाची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल सिल्विना लुना हिच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. वयाच्या 43 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची प्लास्टिक सर्जरी झाली होती, त्यानंतर तिला काही आरोग्य समस्या येऊ लागल्या यामध्ये किडनीशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या होत्या.
सिल्विना लुना यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अर्जेंटिना चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. तिचे वकील फर्नांडो बर्लँडो यांनी मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. रिपोर्ट्सनुसार, 2011 मध्ये प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर काही दिवसांनी सिल्विना लुनाला आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या. यानंतर त्यांना किडनीशी संबंधित समस्याचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला.
गेल्या ७९ दिवसांपासून लुनाला अर्जेंटिना येथील इटालिनो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे तिच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी, 31 ऑगस्ट रोजी सिल्विना लुना यांनी जगाचा निरोप घेतला. उपचारादरम्यान अभिनेत्रीला प्राण गमवावे लागल्याने चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अभिनेत्रींच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे.अर्जेंटिनाचा अभिनेता गुस्तावो कॉन्टीने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले की, आम्ही तुझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे. यापुढेही कायम प्रेम करू. तू आमच्या कुटुंबाचाच एक भाग होतीस.