पिंपरी | खांडगे इंग्लिश मीडियम शाळेमध्ये वृक्षारोपण
Updated On:

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या वेळी इयत्ता १० वीचे विद्यार्थी, मुख्याध्यापक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या वेळी सन २०२४-२५ या वर्षाची थीम ही जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण थांबवणे आणि दुष्काळी प्रतिकारशक्ती निर्माण करणे असा आहेत. पर्यावरण रक्षण आणि जतन करणे ही काळाची गरज तरआहेच.
पण, पृथ्वीचा समतोल राखणेही तितकेच गरजेचे आहे अशा आशयाची प्रतिज्ञा या वेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दर्शना सकते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.




