शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एस टी स्थानक परिसरात शासनाच्या ‘झाडे लावा झाडे जगवा’ या संदेशाला प्रतिसाद देत विविध वृक्षारोपण करण्यात आले असून एस टी आगाराच्या वतीने या झाडांची देखभाल करण्यात येणार आहे.
शिक्रापूर येथील एस टी स्थानक परिसरात विविध देशी झाडांची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले आहे.याप्रसंगी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, वाहतूक व्यवस्थापक महेंद्र माघाडे, वाहतूक नियंत्रक दिलीप खोडाळ, दत्तात्रय भुजबळ, अर्जुन चव्हाण, शांताराम दौंडकर, नाना दिवटे, सुधाकर पाचुंदकर यांसह आदी मान्यवर व एस टी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रत्येकाने झाडे लावून झाडे झाडांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी व्यक्त केले. यावेळी लावण्यात आलेल्या सर्व झाडांचे संगोपन एस टी आगाराच्या वतीने करत झाडांची योग्य देखभाल केली जाणार असल्याचे शिक्रापूर विभागाचे वाहतूक नियंत्रक दिलीप खोडाळ यांनी सांगितले.