धक्कादायक ! वैमानिकांवर मांजरीचा हल्ला; विमानाचं तातडीने करावं लागलं ‘लँडींग’

नवी दिल्ली – हॉलिवूडमध्य एक चित्रपट आला होता. या चित्रपटात अनेक प्रकराचे साप विमानातून घेऊन जात होते. मात्र मध्येच विमानातील काही साप आपल्या बॉक्समधून बाहेर पडतात आणि एकच गोंधळ उडतो. असाच काहीसा किस्सा सुदानची राजधानी खार्टूम येथे घडला आहे. एका मांजरीने घातलेल्या गोंधळामुळे विमान चक्क विमानतळावर लँड करावे लागले.

विमानातील वैमानिकांच्या कॅबिनमध्ये असलेल्या मांजरीने विमानचालक अर्थात वैमानिकांवर हल्ला केला. यावेळी वैमानिकांनी मांजरीला पकडण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र मांजर त्यांच्या हाती लागलं नाही. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे विमान अर्ध्या तासाने परत विमानतळावर परत घेण्यात आले.

हल्ला केलेल्या मांजराला पकडण्यासाठी वैमानिकांनी प्रयत्न केले, पण आक्रमक झालेले मांजर वैमानिकांच्या आणि विमानातील इतर कर्मचाऱ्यांच्या हाती लागले नाही. हे विमान सुदानची राजधानी असलेल्या खार्टूम विमानतळावरून प्रवाशांना घेऊन निघाले होते.  मात्र मांजरीच्या गोंधळामुळे वैमानिकांनी विमान पुन्हा खार्टूम विमानतळावर लँड केले. या अर्ध्या तासाच्या कालावधीत विमान हवेत तरंगत होते. विमानतळावर विमान उभं असताना मांजर विमानात शिरलं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.