आज दुपारच्या सुमारास गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून एक भीषण अपघात झाला. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे समजत आहे. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते. दुर्घटनाग्रस्त विमान बोइंग 787-8ड्रीमलाइनर (व्हीटी-एएनबी) होते. अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला आहे याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही, परंतु असे मानले जाते की हा आकडा बराच मोठा असेल. चला तर मग जाणून घेऊया भारतातील आतापर्यंतच्या 10 सर्वात भयंकर विमान अपघातांबद्दल.. 1) 1938 मध्ये मध्य प्रदेशातील दातियाजवळ अपघात भारतात पहिला विमान अपघात दातिया येथे 7 मार्च 1938 मध्ये झाला. यात 7 जणांचा मृत्यू झाला. एअर फ्रान्सचे पोटेझ 62 विमान मध्य प्रदेशातील दातियाजवळ कोसळले. प्रवासी विमानात आग लागली. हे विमान व्हिएतनाममधील हनोईहून फ्रान्समधील पॅरिसला जात होते. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा हे विमान प्रयागराजहून जोधपूरला जात होते. या अपघातात तीन क्रू मेंबर्स आणि चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 2) टाटा नॅशनल एअरलाइन्सचा अपघात 14 ऑगस्ट 1943 ला लोणावळ्यात टाटा नॅशनल एअरलाइन्सचा अपघात झाला होता. टाटा नॅशनल एअरलाइन्सचे स्टिन्सन मॉडेलचे प्रवासी विमान महाराष्ट्रातील लोणावळा येथे डोंगरांवर आदळले. ते कोलंबोहून कराचीला जात होते. 3) घाटकोपर विमान अपघात 12 जुलै 1949 घाटकोपर विमान अपघात घडला. या अपघातात 45 जणांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियातील जकार्ताहून नेदरलँड्समधील अॅमस्टरडॅमला जाणारे लॉकहीड कॉन्स्टेलेशन विमान मुंबईतील घाटकोपरजवळ खराब हवामानात उतरण्याच्या प्रयत्नात कोसळले. या अपघातात 35 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता. या अपघातात अमेरिकन पत्रकार एच.आर. निकरबॉकर यांचा मृत्यू झाला होता. 4) अलितालिया फ्लाइट 771 अपघात 7 जुलै 1962 रोजी जुन्नरमध्ये अलितालिया फ्लाइट 771 चा अपघात झाला. या अपघातात 94 जणांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियातील सिडनीहून रोम, इटली येथे जाणारे विमान मुंबईपासून सुमारे 84 किमी अंतरावर मार्गावरून फिरल्यानंतर एका लहान टेकडीला धडकले आणि हा अपघात झाला. 5) एअर इंडिया फ्लाइट 855 1 जानेवारी 1978 रोजी एअर इंडियाचे बोईंग 747 फ्लाइट 855 मुंबईजवळ अरबी समुद्रात कोसळले. टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच हा अपघात झाला. या अपघातात जवळजवळ विमानातील सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 6) एअर इंडिया फ्लाइट 182 – कनिष्क विमान अपघात 23 जून 1985 रोजी एअर इंडिया फ्लाइट 182 आयर्लंडच्या किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागरात बॉम्बस्फोटात उडून गेले. हा खलिस्तान समर्थकांनी केलेला दहशतवादी हल्ला होता. यामध्ये 329 लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक भारतीय वंशाचे कॅनेडियन नागरिक होते. हा भारतातील सर्वात प्राणघातक विमान अपघात मानला जातो. 7) इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 605 14 फेब्रुवारी 1990 रोजी, बंगळुरूमध्ये एअरबस ए320 विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले आणि शेतात पडले. पायलटच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे समजत आहे. या अपघातात 92 जणांचा मृत्यू झाला. 8) एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 812 22 मे 2010 रोजी, दुबईहून मंगळुरूला परतणारे एअर इंडिया एक्सप्रेस बोईंग 737-800 विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरले आणि कोसळले. या अपघातात 158 जणांचा मृत्यू झाला होता. 9) एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 1344 7 ऑगस्ट 2020 रोजी दुबईहून केरळमधील कोझिकोड विमानतळावर परतणारे विमान मुसळधार पावसात उतरताना धावपट्टीवरून घसरले आणि त्याचे दोन भाग झाले. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला. हे विमान वंदे भारत मिशन अंतर्गत चालवले जात होते. 10) अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. हे विमान लंडनला जात होते. या विमानात क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे एअर इंडियाचे एआय 171 फ्लाइट होते.